स्त्री जीवन
स्त्री जीवन
जन्म झाला लेकीचा म्हणून,
साधे ठेवत ही नाही बारसे....
मुलगा झाल्याचे असते कौतुक, पण
मुलगी झाल्याचे लोकां , आवडत नाही फारसे.....
शाळा, कॉलेज करताना तिला,
अनेक लांडग्या समोरून जावे लागते...
स्वतःच्या इच्छा मारून पोरीला,
कधी कधी प्रेमाची आहुती द्यावी लागते.........
उंबरठा ओलांडून गेल्यावर,
तिच्या नावात होतो बदल....
संसारासाठी राबताना,
तिला खेचत जाते भावनांची दलदल...
दुसऱ्यांसाठी ती नेहमीच जगते,
पण तीच्या अस्तित्वास मिळतो नकार,
स्वतःची ओळख निर्माण कराया,
तिला कधी मिळणार हो अधिकार.?..
