हर्ष दिपवाळी
हर्ष दिपवाळी
वर्ष सरता सरता,
आनंदाचा ठाव घेतो .
नष्ट करुनी तिमिर,
दीपावली सण येतो...||१||
नको जगी दुःखी कोणी,
आला दिवाळीचा सण
हेचि देवा दे रे दान,
होई हर्ष उधळण...!!२!!
बेघरांना दे रे घर,
मिळो भुकेलेल्या अन्न...
खऱ्या अर्थाने होईल,
मन गाभारा प्रसन्न...!!३!!
काळोखात आज सुद्धा,
खूप जण राहतात....
छोटा दिवा लावुनिया,
देवा कडे पाहतात...!!४!!
ज्ञान रुपी प्रकाशाने,
दीपावली ही सजावी...
स्नेह, प्रेम, आपुलकी,
सर्व जगात रुजावी....!!५!!
दिवाळीचा हा उजेड,
जेंव्हा सर्वत्र दाटेल...
तिचं खरी दीपावली,
हेचि हृदयाला वाटेल....!!६!!
