आक्रोश निसर्गाचा
आक्रोश निसर्गाचा
आक्रोश निसर्गाचा ,
आता माणसाला लागलाय कळू....
ढगांच्या डोळ्यातून मोठ्याने,
आता अश्रू लागले आहेत गळू..||१||
झाडा वेलींचा वध करून,
माणूस घर आपले बांधतोय...
झाडे लावा, झाडे जगवा,
हे ही जनास सांगतोय....(दुटप्पी भूमिका ) ||२||
निसर्गाचे अवयव आहेत,
सागर, झाडे अन धरती ..
हिशोब याचा द्यावाच लागेल तुला,
जेंव्हा जाशील तू वरती...||३||
माणूस चुकतो तेंव्हा निसर्ग कोपतो,
हे उशीर झालाय कळायला......
निसर्गाचे संवर्धन जर झाले नाही,
तर लाकडं ही मिळणार नाही जाळायला...||४||
