वसंत फुलला प्रेमाचा
वसंत फुलला प्रेमाचा
शुष्क होते जीवन माझे,
लवलेश ही नव्हता, स्नेहाचा.....
जीवनात तिच्या येण्याने,
मनी वसंत फुलला, प्रेमाचा....||१||
काळजीयुक्त प्रेम तुझे, अन,
आदर करतो तु माझ्या भावनांचा...
तुझ्यासारखा प्रियकर लाभल्याने,
मनी वसंत फुलला, प्रेमाचा...||२||

