दिवाळीच्या स्वागताला
दिवाळीच्या स्वागताला
दूर झाली काळी रात्र,
झाली सुरम्य सकाळ....
दोन वर्षांच्या कालाने,
दूर जाहला दुष्काळ....||१||
रांगोळीचे रंग सारे,
भरू एकत्र होवुनीं....
सारे अंगण सारुया,
उंच कंदील लावूनी .....||२||
प्रेम देवू निःस्वार्थाने,
राग, लोभ दूर करू.....
घेऊ काळजी साऱ्यांची,
मदतीचा ओघ धरू.....||३||
वसू बारस दिनाला,
पूजा गाय वासराची...
घेवू आशीर्वाद सारे,
सौख्य वाढेल साऱ्यांची....||४||
धन त्रयोदशी येता,
दिप अंगणी लाऊया....
नरकचतुर्दशीला
स्नान अभ्यंग करुया....||५||
करु लक्ष्मीचे पुजन,
ताट छान सजवून....
करु आदर ताईचा,
भाऊबीज येता दिन.....||६||
दिवाळीच्या स्वागताला,
उतरती चंद्र तारे....
त्यांच्या दिव्य प्रकाशाने,,
झाले दिप्यमान सारे.....||७||
