मन की बात
मन की बात
आयुष्याचे दोन दिवस,
काढले मी माहेरी जगताना....
उरलेल्या चार दिवसांकडे,
उत्सुकता असायची पहाताना....
बऱयाच गोष्टींचा त्याग करून,
वाढले मी वडिलांच्या घरात....
आई बाबा अन भावाचा,
मार खाल्ला रागाच्या भरात.....
कुणावर तरी प्रेम करावे,
याची कधी झाली नाही हिंमत,..
कारण घरात माझ्या बोलण्याला, असण्याला,
काडीची नव्हती किंमत......
वाटलं होतं साऱ्या सुखाचं गाठोडं,
मला नवऱ्याच्या घरी मिळेल...
माझ्या मनातील भावानांची कदर,
तिथे कोणाला तरी कळेल...
पण पतंगाच्या शेपटीसारखी,
फरपटत मी गेले....
त्यांनी जे जे सांगितले,
मी तसं तसें केले.....
मर्यादा अन जाचक स्त्री बुरखा,
इथे ही तसाच छळतं होता ..
प्रेम होते कामापुरते,
आदर, मानसन्मान मिळतं नव्हता...
यावर कविता लिहिताना,
थरथरले नाही माझे हात....
वाटले मन हलके करावया ,
लिहूया आपली मन की बात....
