भिजलेली पापणी
भिजलेली पापणी
वाटलं होतं मला,
माझ्यावर ही कोणाचं प्रेम बसावं...
मी आहे तसं स्वीकारणारं,
जगात कोणीतरी असावं..
प्रेम केवळ शब्दाचेच नव्हे,
तर नजरेने ते देणारे..
सुखाची सावली देऊनी,
मनाचा वेध घेणारे.....
कोणाशी तरी प्रेमाचा बंध,
जुळला नसेल जर तुझ्या मनातं...
मजकूर माझ्या प्रितीचा,
लिहिशील का गं तुझ्या पानात....
तुझ्या आठवांचा पाऊस,
नेहमी करतो मला भावुक...
माझे तुझ्यावरील प्रेम फक्त,
माझ्या पापण्यासं असतें ठावूक....