मीठाचा सत्याग्रह....
मीठाचा सत्याग्रह....
बारा मार्च निघाली यात्रा,
स्थळ होते साबरामती...
पोहचली यात्रा एप्रिल सहा ला,
दांडी समुद्र किनाऱ्यावरती...
कित्येक अटका होत्या, पण
दांडीयात्रा राहिली सुरु...
नेतृत्व ज्यांचे विशाल होते,
ते महात्मा होते चळवळीचे गुरु...
मीठाच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्यलढ्याला,
मिळाले होते मोठे बळ...
लाखो जनसागर एकवटला होता,
त्याची ब्रिटिश सम्राज्यास लागली झळ.....
चिमूटभर मीठ उचलून गांधीजींनी,
ब्रिटिश राजावटीविरोधात केला कायदेभंग....
लोकसंघटन अन लोकजागृती करून,
लढ्याला आणला महात्माजींनी रंग...
मीठाच्या करावरील विरोधात,
आंदोलन वर्षभर लांबले....
लॉर्ड आयर्विन शी भेटीनंतर,
सत्याग्रह हे थांबले....
