फेरफटका बालपणीचा....
फेरफटका बालपणीचा....
बालपणातली मजा,
खूपच असते हो भारी...
तेच क्षण, ते वरदान देवाकडे,
मागते ही दुनिया सारी...
ना असते जातं, ना असतो धर्म,
एकमेकांसोबत खेळताना..
बालपण अलगद उडून जाते,
पैशामागे पळताना....
कोणी काही बोलले, मारले,
त्याचे काहीच नाही वाटत...
एकमेकांचे डब्बे खाताना,
आमचे प्रेम कधीच नाही आटत....
मैदान आम्हाला कशाला हवे?
आमची हंडी नदीत असते...
एकी अन मैत्रीचे बळ,
हे आमच्या चेहऱ्यावर दिसते..
पैसा, प्रतिष्ठा, मान मिळवला,
पण कसे मिळेल ते हरवलेले बालपण.?..
मनाच्या कोपऱ्यात चिकटून राहिलेय ते,
कालपण, आजपण आणि उद्यापण......
