STORYMIRROR

Sonali Kose

Romance

4  

Sonali Kose

Romance

निर्मळ प्रेम भावना

निर्मळ प्रेम भावना

1 min
437

ह्रुदयात दडलेले प्रेम माझे

फक्त तुझ्यावर निरंतर राहणार

आठवण स्मरते पहिल्या भेटीची

निर्मळ झरा प्रेमाचा वाहणार


भावना मनातील काय सांगावे

बघता बघता कसा जीव जडला

ओठांवर माझ्या नाव तुझेच

अख्खं विश्वही तुझ्यात सामावला


कळला भाव माझ्या मनातला 

निःशब्द अपुले प्रेम बहरले 

होताच ते दिवस जागे अजून

मनोमनी उगीच धुके दाटले


सुख दुःखात तुझ्या सदा

कायम राहणार मी सोबती

आयुष्याच्या खडतर प्रवासात

आपुलकीने जपणार नाती


नयन भिडताच नयनांना

अलवार स्पर्श मनाला होते

होऊनी कधी अधीर मन 

स्वैरभैर प्रेमगीत गावेसे वाटते


स्वप्नांत यावे कधी तुझ्याही

लुकलुकणारे काजवे बनुनी

करुनी प्रकाश अवतीभवती

निघावे रंगात तुझ्याच न्हाहूनी


तुझ्याबद्दल मनात माझ्या

अशा *निर्मळ प्रेम भावना*

होऊनी उगीच वेडी प्रेमात

हवा तूच फक्त माझ्या सजना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance