नातं मैत्रीच, तुझं अन माझं.....
नातं मैत्रीच, तुझं अन माझं.....
नाते मैत्रीचे, तुझे नी माझे,
शब्दातूनी दरवळले...
सप्तसुरांचे गीत बनूनी,
ओठातुनी ह्या ओघळले.....
आज मला जगापेक्षा,
तुझ्यावर आहे ग विश्वास...
मन माझे जिंकलेस तू,
अन बनलीस माझा श्वास.....
खुप कमी माणसे ह्या जगात,
आपल्या सर्वाना भावतात....
काळजी घेतो जो पदोपदी,
आणि मनापासून जीव लावतात....
काही नाती जीवनात,
अशीच नाही बनत....
फुल आणि सुगंधाच नातं,
असच नाही जमत...
आता मला खरंच तुझी,
खुप झालीय सवय.....
चेहऱ्यावर तुझ्या कायम हास्य राहू दे,
बस्स, एवढंच मला हवयं....

