STORYMIRROR

NEEL PAWASKAR NP art & creation

Romance Others

4  

NEEL PAWASKAR NP art & creation

Romance Others

मी नि ती (गझल वृत्त-समुदित मदना )

मी नि ती (गझल वृत्त-समुदित मदना )

1 min
418

भरून येते मनही जेव्हा, जाणत असतो तिला

वळून बघतो मनात पुन्हा, शोधत असतो तिला 


कधी दूरवर भरकटते मन, उनाड माळा वरी

हिरवाईच्या फुलवारीवर, माळत असतो तिला


लाटांवरती येती लाटा, नदी किनारी अता

वाळूवरच्या रेघोट्यांशी, तोलत असतो तिला


पाण्यामध्ये तरंगणारी, नाव एकटी उभी

माझी म्हणुनी मनापासुनी, भुलवत असतो तिला


हुंदडताना तिच्यासवे मन, खुशीत हसते सदा

तिचाच हाती हात घेऊनी, फिरवत असतो तिला


हातामध्ये हात तिच्याही, हात माझा होता

डोळे मिटुनी हृदयातच मी, स्पर्शत असतो तिला


कठोर होता मन माझेही, समीप जाते तिच्या

आपसूक त्या ओल्या नयनी, कळवत असतो तिला


रोज नव्याने तिचीच चाहूल, सदैव होते मला

अपादमस्तक नजरेमध्ये, भरवत असतो तिला


सकाळसंध्या तिचीच प्रतिमा, मिठीत असते सदा

नयनाश्रूंनी ओल्या माती, घडवत असतो तिला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance