STORYMIRROR

NEEL PAWASKAR NP art & creation

Inspirational

3  

NEEL PAWASKAR NP art & creation

Inspirational

दीप (गझल वृत्त - अनलज्वाला)

दीप (गझल वृत्त - अनलज्वाला)

1 min
526

दीप जळू दे उज्वलतेचे, जगात सारे

आयुरारोग्य उदंड नांदो, घरात सारे


गरिबांच्याही वदनावरती, हसू खुलू दे

फराळ कपडे मिळू दे स्वस्त, दरात सारे


दीप स्तंभ हा सज्ञानाचा, उजळो देवा

ज्ञान प्रकाशी तेज फुलू दे, मनात सारे


एक दिवाळी रंकाची हो, मनासारखी

ते मग हसतील आनंदाच्या, भरात सारे


माय विरांची घरी एकटी, वाट पहाते

सणवाराला सैनिक लढती, रणात सारे


किती कष्ट ते वाटेला त्या, शेतकऱ्यांच्या

दुःख तयांचे पसार होवो, क्षणात सारे


अवमानाचा कहर होतोय,इथे कितीदा

सन्मानाचे दिवे पेटवा, सणात सारे


एकतरी जर दिवा तिचाही,विकला गेला

दिवाळीतही तुझ्या राहती, ऋणात सारे


सुख-दुःखेही वाटून घेऊ, आपण थोडी

दीप पेटवू नाचू गाऊ, सुरात सारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational