STORYMIRROR

Sarika Ingole

Inspirational

3  

Sarika Ingole

Inspirational

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा

1 min
17

सह्याद्रीचा वेश माझ्या अवनीला

ठाम उभा हा भगवा ध्वजा

शतशः नमन तुला शिवाजी राजा

कशी गाऊ या महाराष्ट्राची यशोगाथा

जय जय महाराष्ट्र माझा...


सांडिले रुधिर या मातीसाठी

आसमंत गर्जावा दिली प्राणाची आहुती

महाराष्ट्राच्या महानतेची खोल खोल महती

सागराच्या अरबी लाटा इथे नांदती

जय जय महाराष्ट्र माझा


अभंग पोवाडा गवळण ओवी

हिरवाईने नटूनी उभा सह्याद्री ताठ

लाख संकटे अनेक घाव गोदावरीचे काठ

कशी गाऊ या महाराष्ट्राची गाथा

जय जय महाराष्ट्र माझा


ज्ञानोबा तुकाराम अशा संतांची ही भूमी

संत बहिणाबाई मुक्ताबाई जनाबाई

गोदा कृष्ण कोयना इंद्रायणी वाटे अमृताची राई

सर्व मागे उभी जननी आई तुळजाभवानी

जय जय महाराष्ट्र माझा


कशी गाऊ या महाराष्ट्राची यशोगाथा

जय जय महाराष्ट्र माझा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational