बापाची चिमुकली
बापाची चिमुकली
कळी उमलता घरात
उत्साहाचे कारंजेचे मनामनात
भातुकलीच्या खेळात रममाण
पैजणाचा नाद तिच्या रूपात...
चिमुकलीचा प्राण बापाचा श्वास
मायेचा उदर दरवळतो खास
प्रेमाची स्फूर्ती तारका बिलगता
स्वर्गाचा वाटे घराघरात आभास...
सासरच्या अंगणी बहरता
जुळवी नात्यांची गुंफन वेल
सुखदुःखाचा पहाड सांभाळताना
नवा जीव उमले तिच्या उदरात...
बापाची चिमुकली आता झाली आई
कन्या भगिनी सखी माता सहचारिणी होईल
तूच आजची जिजाऊ आजची सावित्रीबाई
प्रत्येक भूमिका दिसे तुझ्या ठाई ठाई...
तुझ्या अस्तित्वाचा ठसा उमटवूनी
आज तू उभी जगत जननी
नभंगणापलीकडे तुझी भरारी
नाविन्याची लिलया तू आजची नारी....
