STORYMIRROR

स्मिता दोशी

Inspirational

3  

स्मिता दोशी

Inspirational

श्रावणसरी

श्रावणसरी

1 min
196

किती इंद्रधनुशी त्या श्रावणसरी 

आठवतात आजही मज त्या श्रावणसरी

ढग।क्षणात येतात,क्षणात जातात

क्षणात ऊन न क्षणात पाऊस

किती हा पाठशिवणीचा खेळ

नाही कशाला कशाचा मेळ

त्यानं यावं,त्यानं पाहावं

लाजेने मी चुरचुर व्हावं

एकदा तो अचानकच आला

नी मला डीवचून गेला

श्रावणसरींची बरसात सुरू झाली

प्रेमींना भेटण्याची लगबग आस लागली

पावसाच्या मंद सरीप्रमानणं बरसावं

शीतल चांदण्यात मन मोहरावं

आज अचानक आठवण झाली

आठवणीतील श्रावणसर हळूच डोकावली

पुन्हा एकदा नखशिखान्त शहारली

मनाला माझ्या मोहवून गेली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational