STORYMIRROR

स्मिता दोशी

Inspirational

3  

स्मिता दोशी

Inspirational

बावनकशी सोनं

बावनकशी सोनं

1 min
125

का हो मालवता तिला

तिला घेऊ देना श्वास

तिला हक्क जगण्याचा

का करता नष्ट तिला


लाडाची ती सानुकली

उजळवेल हो घर

संस्काराची ती हो खाण

आपली ती लाडुकली


स्त्री जन्माचा उद्धार ती

होई सर्वांचा सर्वांचा

थांबवा तिचा संहार

बावनकशी सोनं ती


कॅरटविषयी का शँका

आपुलीच ती निर्मिती

ऋणी आजन्म सर्वांची

मग का अग्निपरीक्षा


कन्यादानाचे हो पुण्य

मिळेल ना आपुल्याला

थांबवा अत्याचाराला

येऊ द्या तीस जन्माला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational