STORYMIRROR

स्मिता दोशी

Classics

3  

स्मिता दोशी

Classics

स्पर्धेसाठी शिर्षक–श्रावणसरी

स्पर्धेसाठी शिर्षक–श्रावणसरी

1 min
133

 किती इंद्रधनुशी त्या श्रावणसरी 

आठवतात आजही मज त्या श्रावणसरी

ढग क्षणात येतात, क्षणात जातात

क्षणात ऊन न क्षणात पाऊस

किती हा पाठशिवणीचा खेळ

नाही कशाला कशाचा मेळ ----

त्यानं यावं,त्यानं पाहावं

लाजेने मी चुरचुर व्हावं

एकदा तो अचानकच आला

नी मला डीवचून गेला----

श्रावणसरींची बरसात सुरू झाली

प्रेमींना भेटण्याची लगबग आस लागली

पावसाच्या मंद सरीप्रमानणं बरसावं

शीतल चांदण्यात मन मोहरावं----

आज अचानक आठवण झाली

आठवणीतील श्रावणसर हळूच डोकावली

पुन्हा एकदा नखशिखान्त शहारली

मनाला माझ्या मोहवून गेली----


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics