STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Inspirational

3  

Ashok Shivram Veer

Inspirational

प्रेम

प्रेम

1 min
193

असताना सोबत तुझी 

कशाची मला भिती,

ठेवूनी साक्ष प्रेमाची दिलाय 

तुझ्या मी हात हाती


मनापासूनी केलंय तू 

खरं प्रेम माझ्यावर,

म्हणूनच हात हाती दिलाय 

ठेवूनी विश्वास तुझ्यावर


दाखवू करूनी सार्थ 

या विश्वासाला अन प्रेमाला,

असेच घट्ट करुया

आपल्यातील गोड नात्याला


नको सोडावयास कधी

हा धरलेला हात हाती,

चल पेटवू आपण

भविष्याच्या दोन ज्योती


असताना सोबत तुझी 

कशाची मला भिती,

ठेवूनी साक्ष प्रेमाची दिलाय 

तुझ्या मी हात हाती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational