STORYMIRROR

NEEL PAWASKAR NP art & creation

Others

3  

NEEL PAWASKAR NP art & creation

Others

आली आली दीपावली ( अष्टाक्षरी काव्य )

आली आली दीपावली ( अष्टाक्षरी काव्य )

1 min
412

देण्या सुखाची सावली

लक्ष्मी पूजना पावली

करू आनंदे साजरी

आली आली दीपावली ।।१।।


किल्ले मातीचे उभारू

खाता लाडू नि चकली

काढू अंगणी रांगोळी

आली आली दीपावली ।।२।।


चक्री पाऊस फटाके

दारी तोरणे सजली

लावू कंदील पणती

आली आली दीपावली ।।३


बैलगाडी मामाजीची

भाऊबीजेसाठी आली

म्हणे मामाला बघुनी

आली आली दीपावली ।।४।।


भेटा आनंदाने सारे

म्हणा शुभ दीपावली

सुख दुःख वाटायाला

आली आली दीपावली ।।५।।


Rate this content
Log in