कोणीतरी पाहिजे
कोणीतरी पाहिजे
सत्य अपुल्या जीवनाचे, सांगणारा पाहिजे
आणि सारे सत्य आहे, मानणारा पाहिजे
कोणत्याही कारणांनी, घातला जर वादही
तातडीने तोडगाही, काढणारा पाहिजे
साक्ष खोट्या न्यायदानी, चालती बघ सारख्या
न्याय घेण्या कायद्याने, झुंजणारा पाहिजे
मानहानी लाचखोरी, लूट सारी वाढली
लोकनेता लोकशाही, तारणारा पाहिजे
खूप झाला रावणाचा, वास येथे भूवरी
मारुती होऊन लंका, जाळणारा पाहिजे
