STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

बापासारखा मित्र

बापासारखा मित्र

1 min
180

बापाचं पायतान

मुलाच्या पायात जातं तेव्हा

बाप त्याच्या खांद्यावर हात ठेऊन

पावलं पुढे टाकतो

म्हातारपणी काठी होण्याचा

आधार त्याला वाटतो

म्हातारपणाची काठी कधी निसटून जाते 

काहीच कळत नाही

आतल्याआत जळणारा बाप मात्र

कोणालाच दिसत नाही


मुलासाठी बाप मित्रासारखा असतो

त्यांच्यासारखा मित्र दुसरा कोणी नसतो

पण चार मित्रांचे हात

 मुलांच्या गळ्यात पडतात तेंव्हा

बापाचा हात सुटत रहातो

हळुहळु बाप मागे पडतो जातो

मागे वळून बघण्याची तो तसदी घेत नाही

मित्रांच्या गर्दीतले पाय 

बापाकडे वळत नाही


बापाचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं

पण ते दिसत नसतं

वेदना यातना सहण करून ही

बाप डोळ्यातून अश्रू येऊ देत नाही

बापाने मारलेली मीठी

सैल झाल्यावर पुन्हा घट्ट होत नाही

बापाला फक्त मुलांच्या चेहऱ्यावर

एक स्माईली हवं असतं

कारण त्याच्याशिवाय बापाचं जगणं नसतं


कधीतरी केंव्हातरी कुठेतरी

मुलगा दुरदेशी निघून जातो

पुन्हा परत येत नाही

चार भिंतींच्या घरात

बापाशिवाय कोणी रहात नाही

उंबरठ्यावर बसुन बाप मुलांची

वाट पहात असतो

एकांतात एकटाच रडून घेतो असतो

खरंतर बापासारखं जगणं

कोणालाच जमत नसतं

बापाने पाठीवर ठेवलेला हात

जगायला बळ देत असतं


बापाला वाटतं

येईल माझा मुलगा मला घेऊन जाईल

त्यांच्यासोबत मी पुन्हा लहान होऊन राहिल

अस्थी विसर्जन होते तरी मुलगा येत नाही

दुरदेशी गेलेल्या मुलाला बाप आठवत नाही 

नका देऊ यार हो अंतर आपल्या बापाला

बापाशिवाय जगणं नसतं

बापाच्याच अंगाखांद्यावर

मुलांच खेळणकुदन असतं


कधीकाळी सोबतचे मित्र

दुर होऊन जातात

बापचं सोबतीला असतो

बापासारखा मित्र दुसरा कोणी नसतो

खरचं बाप म्हणजे एक हळवं पात्र असतं

पण ते कुणालाच कळत नसतं



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational