STORYMIRROR

Sonali Kose

Inspirational Others

3  

Sonali Kose

Inspirational Others

भारतीय संविधान

भारतीय संविधान

1 min
131

आज अंगावर नवनविन कपडे चालतोय सुटाबुटात

राहायला माळी नी फिरायला गाडी

हे फक्त माझ्या संविधानाने दिलं....


कुत्र्या मांजरीहूनही किती

वाईट दशा होती आमची

गळ्यात मडकं नी कमरेला झाडू

नव्हती मुभा पाणी प्यावयाची


विंटाळ मानूनी दूर सारून

करीत होते अन्याय अत्याचार

आमच्या सावलीचाही स्पर्श झाल्यास

मारहाण करायचे फार 


वर्गाचे ते द्वार बंद करून

बाबांनाही बसवायचे बाहेर वर्गाच्या

खिडकीतूनच पूर्ण केला अभ्यास

असल्या अवस्था होत्या 1947 पूर्वीच्या


डोळ्यांत तेल घालून ते दृश्य

माझ्या भिमाने लेखणीने साकारलं

जिवाचे रान नी रक्ताचे करून पाणी

शोषित पीडितांना न्याय मिळवून दिलं


2 वर्ष , 11 महिने , 18 दिवस

इतकं सोपं हा कालावधी नव्हतं 

तहानभूक विसरून स्वतःची

समतेच्या बंधात जनतेला बांधायचं होतं


झिजवूनी स्वतःची काया

गोर गरीबांचा आधी विचार केला

साऱ्या जनतेचे ठरले कैवारी

जेव्हा भारतीय संविधान हा देशास बहाल केला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational