STORYMIRROR

Sonali Kose

Inspirational Others

3  

Sonali Kose

Inspirational Others

भारतीय संविधान

भारतीय संविधान

1 min
182

लेखणी होती धारदार

म्हणून बनली बिल्डिंगची घरदार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे

आम्हांवरती मोलाचे उपकार 


ध्यानीमनी अभ्यासाची जिद्द

पुस्तकांचाही रचला भांडार

एका पेनाच्या टोकावर त्यांनी 

देश उभारून केलाय जीवन साकार


विषमतेचा नायनाट करून

आणली स्वातंत्र्य , समता , बंधुता

*मी* न म्हणता *आम्ही* भारताचे लोक

घडवून आणले ऐक्य व एकात्मता


नव्हतं खावया धड अन्न 

नव्हतं अंगावरती वस्त्र

आज खातोय तुपात पोळी भिजवून 

कारण भिमाची लेखणी होती धारदार शस्त्र


धर्मनिरपेक्ष , लोकशाही घडवून

धर्माची ती बंधनं तोडली

भारतीय संविधानामुळे

सार्वभौम राष्ट्राने माणसे एकत्र जोडली


ना केली कुणी , ना करणार कुणी

अहोरात्र मेहनत माझ्या भिमावानी

भारताची लिहूनी *राज्यघटना*

प्राशिले आम्हांस अमृतवाणी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational