माझा बाप
माझा बाप
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
बाप माझा
देवाचे रुप,
साक्षात देवच
माझा बाप...
आम्हा लेकरासाठी
घेतला अवतार,
केले जन्मभर
कष्ट अपार...
दुःख, दारिद्रय
सोसले खूप,
आई रुक्मिणी
विठ्ठल बाप...
केला कष्टाने
सुखी संसार,
दिले अनमोल
शिक्षण, संस्कार...
लाचारी नाही
आवडली त्यांना,
सत्य वचन
स्वाभिमानी बाणा...
महापुरुष, महात्मा
कर्मयोगी,नेता
माझ्यासाठी देवच
p>
बाप माझा होता...
फिटणार कसे
आई बापाचे ऋण
चरणी त्यांच्या
अर्पण पंचप्राण...
झिजविला देह
स्वप्ने मोठी होती,
गावी किती
आई बापाची महती!
मागणे देवाला
आहे माझे खूप,
जन्मोजन्मी हवेत
हेच आई बाप...
सुखी ठेव देवा
माझ्या आई बापाला,
मागणे दुसरे
मागू काय तुला...
त्यांच्या मुळेच
मी आलो भूमी वरती,
गाईन मी रोज
आई बापाची आरती...