STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

3  

vaishali vartak

Inspirational

विचार

विचार

1 min
17

होते बसले निवांत

 मनी माजले काहूर

 सुरू थैमान विचारांचे

 झाला मेंदूचा चक्काचूर 


 किती किती हा भ्रष्टाचार

 लहानांपासून मोठे सारे

 सर्व क्षेत्रात माजलेलाच

 रूप प्रत्येकाचे न्यारे


 सारे व्यवहार चालती

 टेबलाच्या खालूनी सदा

 निती नियमांची नसे चाड

 स्वतःचा फायदा पाहती सर्वदा


कधी, कसे, केव्हा थांबणार

 जाळे हे भ्रष्टाचाराचे 

जो तो सांगे येथे विचार 

आपल्याच मोठेपणाचे


विचार करून करुन

पेटला वणवा विचारांचा

सांगा उपाय कसा मिळवू

मनी विचार ,निवांतांचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational