STORYMIRROR

Deepali Mathane

Romance

4  

Deepali Mathane

Romance

कसे कळावे तुला

कसे कळावे तुला

1 min
540

कसे कळावे तुला साजणा

भाव माझ्या मनातले

जपले माझ्या मनात मी

मोती जणू शिंपल्यातले

    कशी कळावी तगमग ही

    अबोल शब्द ओठातले

     भावविश्वातुनी रमले

     जीवन हे वाटेतले

कशी कळावी वेदना ही

साठवीत अश्रूंची फुले

उधळूनी रंग प्रीतीचे

रेशीमबंध व्हावे खुले

   कशी कळावी आठवण ही

   मनपाखरू हे आवरले

   मी माझेपण तुझ्यात गुंतुनी

   तुझ्या आठवणींनी सावरले

कसे कळावे तुला साजणा

मूक अश्रू हसण्यातले

आशेच्या तप्त निखाऱ्यात

दिसे भाव हे फसण्यातले........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance