कळस
कळस
जेव्हा मी तुझ्या डोळ्यात पाहतो
काहूर भावनांचा कसा तेव्हा उठतो
हृदयात स्पंदनांचा रास हा चालतो
हसऱ्या गालांचा गुलाब जेव्हा बोलतो
जीवाचा अवघ्या बघ गुंता होतो
अंतरीचा दाह आसमंतात पोहचतो
प्रीतीचा आपल्या कळस तेव्हा गाठतो
मिठीत घेता तुला काळही जेव्हा गोठतो

