STORYMIRROR

Sandhya (Bhoir)Shinde

Tragedy

3  

Sandhya (Bhoir)Shinde

Tragedy

गेलीस जरी ...तू

गेलीस जरी ...तू

1 min
165

गेलीस नजरेच्या पल्याड जरी...

काहीशी झालीस नाहीशीही तू...

हृदयाच्या तरी ठोक्यांमध्ये......

अजूनही कायम धडधडतेस तू...

अडखळला जरी श्वास माझा

उरात पुरी सामावतेस तू...

स्थिरावली जरी दृष्टी माझी

नजरेत फक्त मावतेस तू...

भ्रांती कुठे आहे कसलीही

स्वप्न होऊन छळतेस तू...

दिवसांचा तर नसे मागमूसही

रात्र होऊन बघ जागतेस तू...

अस्तित्वच असताना माझा..

तुला माझ्यातूनच मागतेस तू...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy