मला तू जिंकून घेतोस...
मला तू जिंकून घेतोस...
अवतीभवती माझ्या गुणगुणत
जेव्हा तू भुंग्याप्रमाणे फिरतोस..
सामान्य तुझ्या या अर्धांगिनीला
तुझ्या दिलाची राणी करतोस..
हवे नको ते पाहून माझा पडता
शब्दही जेव्हा तू अलगद झेलतोस..
संकटांची झळ न लावता जीवनाचं
शिवधनुष्य तू लीलया पेलतोस..
माझ्या अबोल भावनांना तुझ्या
स्मितभरल्या मुखातून तू बोलतोस..
घडल्या बिघडल्या चुकांना माझ्या
न्यायाने तुझ्या तू सहज तोलतोस..
आणि काय हवं जगायला..
तुझ्या माझ्या सुखाशिवाय..
किती सहज उलगडतोस..
माझ्याविना आयुष्याचं स्वप्नं ही
पहायला जेव्हा सख्या तू अडतोस...
संसारात दान माझ्या पदरी टाकून
पूर्णतः मला तू जिंकून घेतोस...

