STORYMIRROR

Sandhya (Bhoir)Shinde

Abstract Others

3  

Sandhya (Bhoir)Shinde

Abstract Others

तक्रार

तक्रार

1 min
251

लहान सहान तक्रार घेऊन 

सांगा जायचं तरी कुठे??

घडवले ज्या विधात्याने 

त्याला तरी कुठे पाझर फुटे??


तुटक्या या सुरांना घेऊन

सांगा गायचं तरी कसे??

जन्मदात्यांच्या या ऋणात

विनाउतराई मी आणखी फसे!!


निराशेने ग्रासलेले जीवन

सांगा जगायचे तरी किती??

उत्तरानेच गिळले प्रश्नाला

अन पर्यायाला उरली भीती!!


आशेला आलेली मरगळ

सांगा जाईल तरी कधी??

भरकटलेली नौका माझी

राहील का अशी अधींमधी??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract