भूतकाळ
भूतकाळ
1 min
241
भूतकाळ निघून जातो
मागे आठवणी सोडून जातो
लाटेप्रमाणे काठावर अवशेष सोडून जातो
स्मृतींच्या त्या रेघोटयांमध्ये जीव जडून जातो
हरेक शिंपल्यात काळ मात्र तसाच पडून राहतो
हृदयात कायमच्याच राहतात त्या आठवणी
मनाच्याही नकळत होत राहतात ह्या साठवणी
जगतो जरी आज आशेने उद्यासाठी
गतकाळाच्या आठवणींच्या बांधून ठेवतो गाठी
खरंच भूतकाळ जातो का निघून??
विचारावे प्रत्येकाने अंतर्मनात डोकावून..
