तोल मनाचा..
तोल मनाचा..
1 min
228
ढळला सावरला
कधी भरकटला
सदा डगमगला
तोल मनाचा..
उगा तडफडला
कधी भांबावला
अस्थिरच राहिला
तोल मनाचा..
समजावू पाहिला
अडीगच राहिला
अजिंक्यच झाला
तोल मनाचा..
आवरता न आवरला
भाव गुंत्यात गुंतला
इंद्रधनुतच रंगला
तोल मनाचा..