STORYMIRROR

Sandhya (Bhoir)Shinde

Romance Others

3  

Sandhya (Bhoir)Shinde

Romance Others

प्रेम तुझं माझं

प्रेम तुझं माझं

1 min
192

प्रेम तुझं माझं

शब्दांच्याही पलीकडलं

खोल मनात रुजलेलं


मन तुझं माझं

भावनांच्यात गुरफटलेलं

अंतर्मनात मात्र सजलेलं


शरीर तुझं माझं

भिन्न जरी असलेलं

मनाने एकरूप झालेलं


जीवन तुझं माझं

एकमेकांनाचं अर्पिलेलं

प्रेमासाठीच आसुसलेलं


प्रेम तुझं माझं

फुलाप्रमाणे बहरलेलं

तनामनावर मोहरलेलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance