STORYMIRROR

Deore Vaishali

Romance

3  

Deore Vaishali

Romance

चहा आणि तू

चहा आणि तू

1 min
746

रिमझिम पाऊस ,

 वाफाळणारा चहा,

सोबतीला तु ,

हेच तर सुख,...


चहाची गोडी,

सोबतीला भज्जे,

गप्पाची मैफिल,

हेच तर सुख...


कडकडणार्या विजा,

थंडीचा तो गारवा,

हातात आल्याचा 

चहा हेच तर सुख...


विसरुन सारे क्षीण,

सुष्टीही होते रंगीन,

पावसाच्या सरीचा 

मधूर सूर हेच तर सुख...


पाऊस व चहाची संगत

प्रेमालाही येते रंगत,

वाफळणाऱ्या चहासोबत,

आनंदाचा अनुभव हेच तर सुख...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance