STORYMIRROR

सपना अंभोरे

Romance Others

3  

सपना अंभोरे

Romance Others

झिंगाट विडंबन

झिंगाट विडंबन

1 min
296

हृदयात होतंय धडधड, जेव्हा आठवण तुझी आली...

आठवता तुला, गोड खळी पडे गालावरी...

आता वेडी झालेया, बघ तुझ्यासाठी बावरी झालेया...

अन् तुझ्याचसाठी बनून राधा तुझ्या प्रेमात पडलेया...

लाजतय गालात, हसतय जोरात, मन हे वेडे झालंया...

झालं झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट


तुझ्यात हरवून, तुझ्यासाठी गाणं मी गायिलं...

सगळं काही तुझ्यात, जग बाजूला राहिलं...

नटून थटून आलेया, तुझ्या भेटीला आलेया...

छान पंजाबी ड्रेस घालून, कपाळी टिकली लावून आलेया...

अरे सगळ्या जगात, तुझ्या प्रेमात, मी हरवलेया...

झालं झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट


दिवसरात्र विचार तुझाच, तूच माझ्या मनी...

कधी व्हनार तू राजा माझ्या कुंकवाचा धनी...

तुझ्या स्वप्नात रंगलेया, तुझ्या प्रेमात पडलेया...

एकून तुझ आता, मी लय वर्ष थांबलेया...

कर तयारी जोरात, घेऊन ये वरात, आता मंडपात बसुया...

झालं झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance