अन् चेहऱ्यावर हास्य उमटते
अन् चेहऱ्यावर हास्य उमटते
हसण्यासाठी कारण घडावे लागते...
विनाकारण हसायला प्रेमात पडावे लागते...
माझ्या सोबत ही असचं काही तरी घडते...
विनाकारण चेहऱ्यावर हास्य उमटते...
सहज काम करता करता त्याचे बोलणे आठवते...
आठवता त्याला चोरून मन माझे लाजते...
अन् अचानक चेहऱ्यावर हास्य उमटते...
विचार त्याचा येताच, गोड खळी गालावर पडते...
अव्यक्त मनाची, अबोल कळी तेव्हा खुलते...
अन् अचानक चेहऱ्यावर हास्य उमटते...
दिवस आठवणीत अन् रात्र स्वप्नांत जाते...
तेव्हा दिवस मनमोहक अन् रात्र ही रंगीबिरंगी वाटते...
मनाची स्वारी ही, स्वप्नांच्या नगरीत रमते...
अन् अचानक चेहऱ्यावर हास्य उमटते...
नसते कुठलेच भान, सर्व ध्यान त्याच्यात असते...
गोंधळागोंधळ होतो मनात, धडधड हृदयात होते...
समजत नाही काही, काय हालत या मनाची होते...
अन् अचानक चेहऱ्यावर हास्य उमटते...
