तुझा माझां संसार
तुझा माझां संसार
संसारात आपल्या सखा
अजून काय हवं रे....?
मिळावं सोन्यासारखं घरटं लेकराला
एवढंच देवाला मागणं मागतो रे...
नवं घर, नवा संसार
करू सुरूवात नव्यानं,
सरंल दुख, येईल सुख घरात
आपल्या संसारात
देवाच्या आशीर्वादाने
आपल्या प्रेमाचं फुल
ऊमलेल आपल्या कुशीतून,
देऊ त्याला बळ लढण्याचे
येणाऱ्या प्रत्येक संकटात
आधाराची काठी तो
आपल्या म्हातारपणाची
आरसा आपल्या भविष्याचा,
दुख:चे डोगर पोखरून तो
दाखविन सुखाची चाहूल तो
तुझ्या माझ्या संसाराला
आणि काय हवं.......
कष्टाची भाकर खाऊन
सुखी संसार करत होतो

