STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Tragedy

2  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Tragedy

प्रेम

प्रेम

1 min
51

सख्या तू थोडं समजून घे ना.... 


थोडे मनातील माझ्या

 सख्या तू ऐक ना

 अर्धांगिनी मी तुझी 

साद तु मज देना..... 


सप्तपदी चालताना

 काही वचन मी तुला दिले

त्या वचनास मी जागते

तू हि थोडे मज समजून घे ना.... 


संसार दोघांचा

आले गेले क्षण

दोघांनी सावरायचे

प्रत्येक क्षणात तू मज साथ देना..... 


सासरचा उंबरठा ओलांडला

 माहेरात मी पाहुणी झाले

तुझे सारे माझे झाले 

माझ्या नात्यांसही तू प्रेम दे ना.... 


जग दोघांचे एकच

संसार सोन्याचा करण्यास झटते

कधी पडले एकटी मी तर

तू आधार देऊन जवळ घे ना.... 


तुझी माणसे माझी झाली

माहेरही मी पुर्णपणे विसरली

नको रे मला बंगला गाडी

लाडाने तू माझे सोहळे पुरे कर ना.... 


आश्वस्त तुझा हात

तुझी साथ निरंतर मजला

जीवन प्रवाही असो वादळ लाटा

त्यातही तू खंबीरपणे उभा रहा ना.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance