पागोळी
पागोळी
पागोळी
मेघ आले उतरून
धारा
किती बरसल्या
रेघ होऊन
येताच
छतावर सरकल्या
आता पागोळ्या बनून
ताल धरून धावल्या
धरणीस चुंबण्या त्या
शुभ्र रांगोळी
जाहल्या
झाडे वेली परीसर
भिजवून गेला छान
पावसाच्या
लोलकांना
कुठे असते स्वभान
दान मिळे आभाळाचे
धन्य झाले
चराचर
कृपादृष्टी समाधान
घेत सजे माझे घर
