STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

लेखणीची जादू

लेखणीची जादू

1 min
471

लेखणी तू न बोलता बरंच काही बोलतेस,,,

कधी सप्तसूर तर कधी मधुर गीत,,,

बनून गळ्यातून बाहेर पडतेस,,

शब्दाला शब्द जोडत नवीन कहाणी बनतेस,,,

बंद भावनांना शब्दात तू देतेस,,

कोऱ्या कागदावर तू आपोआप चालायला लागतेस,,,

लेखणी तुझी जादू आहे वेगळी ,,,

बंद शब्दाची तू चाबी आहेस,,

अदृश्य तुझी जादू,,,,

बरच काही सांगून शिकून जाते,,,

 माणसांची जादूई लेखणी तू आहेस,,,

शब्द -शब्द बनून कहानी बनतेस,,,

मनात दाटलेल्या भावनांना अक्षर होऊन कविता बनतेस,,,

कमजोराची ताकत तर कधी,,,

बंद असलेल्या शब्दाची जादू,,

जादू होऊन कोणाला न्याय तू देतेस,,,

कितीतरी ग्रंथ रचले गेले आणि इतिहास समोर येऊ,,

शौर्य गाथा सांगितले,,,

लेखणी तुझी आहे जादू वेगळी,,,

प्रभावती च्या मनात बसून तिच्या भावना कवितेत दाखवतेस,,,

ऋणी आहे मी तुझी तुझी जादू मला लाभली,,,

लेखणी तू कधी मैत्रीण झाली समजलेच नाही,,,

तूच माझी ओळख निर्माण केलीस,,,

थोरवी आहे तुझी गोड,,

किती गोडवे गाऊ तुझे 

शब्द अपुरे पडले,,,

लेखणीची जादू सांगतां सांगतां,,,

माझे शब्द संपले,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy