नकळत सारं घडलं...
नकळत सारं घडलं...
तुला एकटक पहात असताना,
माझ हृदय तुझ्या प्रेमात पडलं...
तुझ्याशी बोलत असताना,
नकळत सारं घडलं...
तुझ्यासोबत मैत्री करताना
आपल मन जुळल...
मला माहित नाही कसं पण,
नकळत सारं घडलं...
गुपचूप तुझा नं. घ्यायला,
माझ मन तुझ्याच साठी पळल...
तू अगदी जवळ आलीस आणि,
नकळत सारं घडलं...
तुझ्या कडे करून दिले मी,
माझे पूर्ण मन मोकळं,
बघता बघता खरं,
नकळत सारं घडलं...
अस माझ वेड मन,
तुझ्याच मागे धावल...
अगदी योगायोग म्हणावं,
नकळत सारं घडलं...

