तिचं माझं नातंं...
तिचं माझं नातंं...
तिचं माझं नातं....जसं पेन्सिल रबर होतं....
काम आमचे विरोधी....पण सोबत लै गोड होतं....
ती कधी चालायची.... नागमोडी वळण जेव्हा....
खूप झिजून जायचो....तरी पुसायचो पाऊलखुणा तेव्हा....
तिचं चालणं मला जणू.....बोलणंच वाटायचं....
नसली सोबत न ती.... सगळ कम्पास एकट वाटायचं.....
ती एवढी धारदार न....सतत माझ्याशी भांडायची....
जाता जाता पोटात माझ्या....खचकन टोचून पळायची....
किस एवढा खोल तिचा.... काळजापर्यंत भिडायचा.....
झिजून जायचो मी.....पण तो नाही मिटायचा.....
खरंतर तिचं माझं..... खूपच कमी जमायचं....
जिथं पाऊल ठेवायची ती....आख गाव मला शोधायचं....
तिच्यापायी खरंच.... खूप बेईमान मी झालो.....।
आयुष्य जगायचं सोडून.... तिच्या मिठीत संपत गेलो....
चुका करायला हात तिचा....कुणीही धरत नसायचा....
एवढी अवखळ ना ती....कधी कधी कागद पण फाटायचा....
उनाड वागणं तिचं..... न चुकांची कसलीच भीती....
अष्टकांत नव्हतो आम्ही... तरी आयुष्यभराचे सोबती....
एकदा मनात माझ्या आलं.....मीच का झिजून गेलो.....??
झिजताना न कुणी पाहिलं.....मग श्रेय तिलाच का गेलं....??
सहज नजर कागदावर गेली...ती रडून रडून संपली होती...
आयुष्य सोबत रंगवून आमचं.... कणाकणात विखुरली होती..
फुंकरून लोटलेले ते तुकडे माझे... सांगू मला पहात होते....
बघ वेड्या लपेटलेली मी....शोध तुझ्यातच तू उरला कुठे...

