भेट तुझी माझी
भेट तुझी माझी
भेट ती तुझी माझी स्मरते
त्याच गंधाळलेल्या रात्रीची
स्वप्नवत वाटे मला राजा
भेट ती अंबर - धारित्रीची //१//
घेऊनी प्रेमाची ती शपथ
विणून जाळे या हृदयात
बंदिस्त केली तीच प्रतिमा
ओलावलेल्या या नयनात //२//
अश्रूंचा थेंब तो सांडताना
अलगद टिपून त्या ओठी
भावनांचा मेळ घडतांना
गुंतून गेल्या गाठीत गाठी //३//
सूटता सुटेना आठवणी
उकलून कोडे जीवनाची
मांडतांना आज एक एक
कवाडे उघडे ती मनाची //४//
डोकावणाऱ्या धुंद क्षणांना
घट्ट मिठीत मी आवरले
सोडून मोकळा श्वास तोच
उन्मत्त झाकानी सावरले //५//
एकदा भेट सख्या तू मला
करुनी मोकळे तन मन
अव्हेरू नकोस आज मला
स्मरूनी तोच गंधीत क्षण //६//

