STORYMIRROR

Rekha Sonare

Action Inspirational Others

3  

Rekha Sonare

Action Inspirational Others

महाशिवरात्र

महाशिवरात्र

1 min
164

हिंदू धर्माचा पवित्र सण

माघ कृष्ण चतुर्दशी दिन

ओळख ती शिवाची महान रात्र

जेव्हा शिव कैलासाशी झाले लीन.../१/


शिवाने केली  मात शत्रूवर

देवाधिदेव मानता शिवांस

महत्व या महाशिवरात्रीस

शंकर पार्वती लग्नवाढदिवस…./२/


समुद्र मंथन झाले जेव्हा

ब्रह्मांडनाशक विष जाहले

संपूर्ण देही दाह सोसुनी

निळकंठाने सृष्टीस वाचविले…/३/


गायन नृत्य करुनी जागा बोले वैद्य

तांडव नृत्य शमवी ते दाहक गात्र

आशीर्वाद तो सर्वांना देवून

हाच दिवस असे महाशिवरात्र.../४/


आख्यायिका पारध्याची प्रचलीत

प्राणिमात्रही सांगे कर्तव्य कर्म

एक एक बिल्वपत्र पडता पिंडीवर

सोडून सावज तो शिकवी दयाधर्म…./५/


भोलेनाथ, जटाशंकर नाव किती

वसते बारा ज्योतिर्लिंगातूनी

शिवरात्रीचे पंचनाव सांगे

प्रचलित पौराणिक कथातुनी.../६/


शिव ही सत्य, अनंत,अनादी

ओमकार,शक्ती भक्ती देवाय

नंदी बैल सवारी ,डमरू,बाण

मंत्र सदा मुखी ओम नमो शिवाय../७/.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action