चित्रपट.. शोले3/11/22
चित्रपट.. शोले3/11/22
शोले चित्रपट फारच लांब
धमाल केली बघताना फार
मसाला चित्रपट म्हणे त्यास
गब्बर ने केला ठाकुर वर वार….१
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी
ठाकूर बलदेवसिंग त्यांचे नाव
रामगढ निवासी फारच छान
डोंगर कपारीत टुमदार गाव...२
डाकू गब्बर दहशत फार
धान्य, इज्जत लुटून नेई
बंद दारात लपून राही
भीतीनेच लोक कापून जाई...…३
ठाकुरने त्यास पकडले
बेडी ठोकून दिला बंदीवास
सहज पळून गेला गब्बर
तोडून बेडी सोडी कारावास…...४
आग उठली तनमनात
घेई प्रतिशोध करून मात
जीवे मारला त्यांचा परिवार
तोडून दोन्ही ठाकूर हात…...५
सुनेला बघता धवल वस्त्रात
विचार करी गब्बर गोटात शिरू
देऊन लालच दोन चोरांना पैशाचे
आणले कारागृहातून जय अन विरु….६
होते तगडे जय - विरु
पडला गब्बर भारी त्यांना
विचार करता पळून जाण्याचा
ठाकूर सांगे कसे मारले परिजनांना...७
ऐकून त्यांची कथा मार्मिक
दोघे गेले गावात रमून
विरुला भेटली टांगेवाली
अखंड बडबड धन्नोत गमून….८
झाली सुरू प्रेमकहाणी
विरुची अन बसंतीची
नजरेत जयच्या भरली होती
शालीन प्रतिमा त्या राधा विधवेची….९
जेलर असराणीने हसवून फार
आम्हा सर्वा केले लोटपोट
मावशी ती बसंतीची
सदा उगारी मुख सोट…...१०
तिघेही ते सापडले
गब्बर च्या तावडीत
पळता पळता गोळी लागली
जय शिरला मृत्यूदाढित…….११
शोले ते पेटले विरुच्या मनात
पकडले त्या गब्बरला
बदला घेण्या निष्पाप जीवाचा
करून हवाली ठाकुरला…..१२
असा सिनेमा शोले गाजला
लहान थोर मुखी तेच नाव
प्रतिशोधाची आग धगधगे
बॉक्सऑफिस वर मारले भाव.…१३
