STORYMIRROR

Rekha Sonare

Inspirational

3  

Rekha Sonare

Inspirational

माय

माय

1 min
189

धन्य ती माय माझी

असलेली कृपेची सावली

मातेची महती वेगळी

आई अतरंगी सामावली.../१/


काय तिचा महिमा वर्णू

अखंड झिजली लेकरासाठी

दीपक तळहाती घेऊन

तेल टाकताना गाठलीस साठी.../२/


तुझेच संस्कार सदा मिळे

शिकवून तू एकेक धडा

आई तुझ्याच आशीर्वादाने

गिरविते मी संस्कार पाढा…./३/


अन्याय सहन केलास

झेलूनी वार दुष्टांचे

अविरत प्रयत्न सुरू ठेवले

प्रमाण दिलेस आपल्या कष्टाचे.../४/


आई तू ममतेची खाण

वात्सल्य मूर्ती तुझेच नाव

आईविना भिकारी म्हणे

स्वामी तिन्ही जगाचा ठाव../५/


आई तुझे उपकार किती

नाहीच फेडता येत ग

फेडण्याची भाषा करता

नाहीच मी मोठी झाली ग.../६/


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational