परिवार
परिवार
परिवार म्हणजे कुटुंब
आजी-आजोबांनी परिपूर्ण
मायेची पाखर घालून
स्नेहाच्या भिंतीत होते संपूर्ण ...१//
जुन्या काळी कुटुंबात
गप्पात रंगायचं खूप वेळ
मोबाइल ची दुनिया नव्हती
जुळून यायचा सर्वांचा मेळ….२//
दुःखात असता अश्रू पुसणे
कुटुंबच जाणून घ्यायचे
सुखासाठी लढता-लढता
संकटकाळी धावून जायचे….३//
प्रेममाया संस्कार शिदोरी
कुटुंबाचाच वारसा असतो
विभक्त कुटुंबामुळे त्यांना
नात्याच्या आदराचा गंध नसतो...४//
कुटुंबाशी बांधून गाठ
नकोच त्यात वादविवाद
थोर मंडळींचे आशीर्वाद घेवून
साधावा त्यातून गोड सुसंवाद...५//
कुटुंब म्हणजे मायेचा ओलावा
आप्त, स्नेही गणगोतानी
नात्याच्या साखळीत बांधून
अखंड, निर्झर वाही निःस्वार्थ स्रोतानी….६//
