बहुगुणी फळं
बहुगुणी फळं
फळांचा राजा
आंबा असे भारी
थकावट सारी
खाताच ताजा
ते सफरचंद
लोहानी भरले
आरोग्य तारले
औषध बंद
फळ काटेरी
फोड अननस
बनवून रस
लावून चेरी
फळात छान
नागपुरी संत्री
मागतात मंत्री
विदेशी मान
पपई, चिकू
तुरट आवळे
फणस, जांभळे
खाण्यास शिकू
.
फळांची साल
बहुगुणी असे
खत बने तसे
बागेची ढाल
