भेट
भेट
प्रवास नऊ महिन्यांचा पूर्ण झाला
तुझ्या माझ्या भेटीचा क्षण आला
या प्रवासात ना मी तुला पाहिले
न तू मला पाहिले,
तरीही हे वेडे मन तुझ्या स्पर्शासाठी आतुर झाले
तुझ्यात मी स्वतःला पाहते, आणि
पुन्हा पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते
येण्याने तुझ्या आयुष्य माझे बदलून गेले,
तुझ्यात आणि फक्त तुझ्यात मन गुंतु लागले
माझाच अंश आहेस तू
काळजाचा तुकडा नाही, तर माझं काळीज आहेस तू
जन्म झाल्यानंतर मला अनेक नाती मिळाली
पण तुझ्यामुळे आई बनून आज मी पूर्ण झाली
